गुरु परंपरेचे माहेर घर असलेले श्री क्षेत्र दत्त संस्थान मंदिर कोलंबी हे राज्यात सुप्रसिद्ध आहे या मंदिराचा इतिहास पाचशे वर्षा पूर्वीचा आहे. इथले वैशिष्टे म्हणजे श्री दत्त महाराजांची प्रतिमा,अनुसया मातेची मूर्ती व ब्रम्हयंत्र व मूळ पुरुष महंत शिवबक्ष बन महाराज यांची जीवन समाधी आहे . ब्रम्हयंत्राचा इतिहास खूप जुना आहे ब्रम्हयंत्रावर विविध चिन्ह कोरलेली आहेत हे ब्रम्हयंत्र शिवबक्षबन महाराज हे मुखेडच्या माळामध्ये तपस्या करू लागले तपस्येच्या बळावर त्यांना ब्रम्हयंत्र प्रसन्न झाले. त्यांनी ब्रम्हयंत्राचे नामस्मरण बी असे ठेवले त्यांना दृष्टांत झाला की कोलंबी हे गाव जगामध्ये एकच आहे व प्रसन्न झालेल्या ब्रम्हयंत्राची त्यांनी मुखेडच्या माळामधून आणून कोलंबी येथे स्थापना केली.
अशा प्रकारचे ब्रम्हयंत्र हे जगामध्ये तीन ठिकाणी आहेत एक काशी,नेपाळ व कोलंबी,नेपाळ येथील ब्रम्हयंत्र हे मॅक्समुलर स्वतःबरोबर इंग्लंडला घेऊन गेला. ब्रम्हयंत्राची स्थापना महंत शिवबक्ष महाराज यांनी पाचशे वर्षापूर्वी कोलंबी येथे केली .
महंत शिवबक्ष महाराज यांचे गुरु तपस्वी बन महाराज, महंत शिवबक्ष महाराज यांचे शिष्य महंत गैभीबन महाराज, गैभीबन महाराज यांचे शिष्य महंत यांचे शिष्य महंत तुळशीबन महाराज, महंत तुळशीबन महाराज यांचे शिष्य महंत रामेश्वर बन महाराज हे काशीचे होते त्यांनी विद्या तपस्या करून गुरु भक्तांना शिकवण दिली. महंत रामेश्वर बन महाराज यांचे शिष्य महंत प्रसादबन महाराज हे PHD डॉक्टर होते यांच्या प्रसादगाथा व खूप अभ्यास भांडार होता. महंत प्रसादबन महाराज यांचे शिष्य महंत श्री १०८ स्वामी गंभीरबन महाराज होते. महंत श्री १०८ स्वामी गंभीरबन महाराज यांनी गुरु भक्तांसाठी अखंड नामस्मरण व अन्नदान चालू केले येथे कुठलाही भेदभाव न करता भक्तांसाठी सतत नामस्मरण व अन्नदान चालू असते.
महंत श्री १०८ स्वामी गंभीरबन महाराज यांचे शिष्य सातवे महंत यदुबान महाराज हे आजचे मठाधीपती आहेत. मठाचा गुरुभक्त परिवार खूप मोठ्या प्रमाणाचा आहे. संस्थानाच्या ४०च्या वर शाखा आहेत.
श्री क्षेत्र दत्त संस्थान मंदिर कोलंबी येथे दरवर्षी श्री १०८ स्वामी गंभीरबन महाराज यांच्या पुण्यतिथी ला अन्नदान केले जाते या दिवशी लाखो भाविक भक्त उपस्थित असतात व दरवर्षी कार्तिकी पोर्णिमे निमित्त ३ दिवसाची यात्रा भरते यात्रेनिमित महापूजा,पालखी सोहळा व दहीहंडीचा कार्यक्रम असतो लाखो भाविक भक्त यात्रेला येतात.
दरवर्षी दत्त प्रगटदिन सोहळा आयोजित केला जातो.
ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन
स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत कामांमधून त्यांचा कारकीर्द सुरू झाली.
कोलंबी ला स्वतःची ग्रामपंचायत आहे. स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व इतर सुविधा ग्रामपंचायतीतून नियोजित व अंमलात आणल्या जातात.
लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे
2011 च्या जनगणनेनुसार, कोलंबी ची लोकसंख्या 4376 घरांची संख्या 935 आहे. लिंग गुणोत्तर, बालसंख्या व समाजवर्ग यांचे तपशील उपलब्ध आहेत.
शिक्षण आणि संस्था
गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत स्थानिक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी (उदा. जिल्हा परिषद शाळा कोलंबी व श्री शंकरराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कोलंबी ) शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.
आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व अयुर्वेदिक दवाखाने आहेत. गावात पथवाटा व लहान उद्योग व सेवाक्षेत्रात सुधारणा दिसते.
धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव
कार्तिकी पोर्णिमे निमित्त ३ दिवसाची यात्रा भरते यात्रेनिमित महापूजा,पालखी सोहळा व दहीहंडीचा कार्यक्रम असतो लाखो भाविक भक्त यात्रेला येतात.
श्री कृष्ण काठीमाई दशीम निमित्त दरवर्षी एक दिवसाची यात्रा भरते.
कोलंबी येथे श्री दत्त मठ संस्थान कोलंबी हे प्रसिद्ध मंदिर आहे.
या ठिकाणी श्री कृष्ण मंदिर व श्री हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.